Chhattisgarh : सुकमामधील चकमकीत महिला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेली महिला नक्षलवादी ठार झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेली महिला नक्षलवादी ठार झाली आहे. बुस्की नुप्पोन (३५) असे ठार झालेल्या महिला नक्षलवाद्याचे नाव आहे. घटनास्थळावरून एक रायफल, मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने सुकमा जिल्ह्यातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. यात नऊ गुन्ह्यात आरोपी असलेली आणि पाच लाखांचे इनाम जाहीर करण्यात आलेली बुस्की नुप्पोन ठार झाली, असे पोलिसांनी सांगितले.

बुस्की नुप्पोन ही एसीएम (मलंगीर एरिया कमिटी) सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्याविरुद्ध अरणपूर पोलीस ठाण्यात सात, कुंकुंडा येथे एक आणि गदिरास येथे एक गुन्हे दाखल आहेत. घटनास्थळावरून एक .३१५ बोर रायफल, पाच .३१५ रायफल काडतुसे, एक वायरलेस सेट, आठ डिटोनेटर, सुमारे १० मीटर कॉर्डेक्स वायर, चार जिलेटिन रॉड, एक पिथू (लोड कॅरिअर), स्फोटके, एक रेडिओ, एक बंदा (बंडल) आणि नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in