ओमानचे सुल्तान १६ डिसेंबर रोजी भारत भेटीवर पंतप्रधानांसोबत करणार द्विपक्षीय वाटाघाटी

अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार ओमानच्या सुलतांनांची ही पहिलीच भारत भेट आहे. ही भेट भारत आणि ओमान यांच्या रणनिती संबधातील एक मैलाचा दगड ठरणार आहे
ओमानचे सुल्तान १६ डिसेंबर रोजी भारत भेटीवर
पंतप्रधानांसोबत करणार द्विपक्षीय वाटाघाटी

नवी दिल्ली : ओमानचे सुलतान हैथाम बीन तारीक येत्या १६ डिसेंबर रोजी उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळासह भारत भेटीवर येत असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाने रविवारी जाहीर केली.

अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार ओमानच्या सुलतांनांची ही पहिलीच भारत भेट आहे. ही भेट भारत आणि ओमान यांच्या रणनिती संबधातील एक मैलाचा दगड ठरणार आहे. ते भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या निमंत्रणानुसार भारतात येणार आहेत. राष्ट्रपती भवनात स्वत: राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या उपस्थितीत त्यांचा स्वागत सोहळा होणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ रात्रीच्या भोजनाचा भव्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे. भारत आणि ओमान यांच्यात भविष्यातील सहयोगाच्या संधीवर चर्चा होणार आहे. यात क्षेत्रीय स्थैर्य, प्रगती आणि भरभराट या क्षेत्रातील संधींचाही विचार केला जाणार आहे. भारत आणि ओमान यांच्या ऐतिहासिक मैत्री आणि सहकार्याची परंपरा आहे. द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात मागील काही वर्षात दोन्ही देशांनी धोरणात्मक कामगिरी बजावली आहे. दोन्ही देश या क्षेत्रात धोरणात्मक भागीदार आहेत असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in