महुआ मोर्इत्रा यांना संसदीय समितीचे समन्स प्रश्न विचारण्यासाठी लाच प्रकरण

या १५ सदस्यीय समितीचे अध्यक्ष भाजप खासदार विनोद सोनकर म्हणाले आहेत की, समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृह आणि माहिती तंत्रज्ञान खात्यांची मदत घेर्इल.
महुआ मोर्इत्रा यांना संसदीय समितीचे समन्स
प्रश्न विचारण्यासाठी लाच प्रकरण

नवी दिल्ली : लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच घेतल्याबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोर्इत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीसमोर उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबर रोजी त्यांनी या समितीसमोर उपस्थित राहावे, असे या समन्समध्ये नमूद आहे.

या १५ सदस्यीय समितीचे अध्यक्ष भाजप खासदार विनोद सोनकर म्हणाले आहेत की, समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी गृह आणि माहिती तंत्रज्ञान खात्यांची मदत घेर्इल. याआधी वकील जय अनंत देहद्रार्इ आणि भाजप नेते निशिकांत दुबे यांनी या आचार समितीसमोर आपापली भूमिका स्पष्ट नोंदवली आहे. निशिकांत दुबे यांनी महुआ यांच्या विरोधात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रार करताना त्यांनी वकील देहद्रार्इ यांनी पुराव्यादाखल दिलेली कागदपत्रे सादर केली. अदानी समूह आणि पंतप्रधान यांना लक्ष्य करणारे प्रश्न लोकसभेत उपस्थित करण्यासाठी मोर्इत्रा रोख रक्कम घेतात, असा आरोप निशिकांत दुबे यांनी केला होता. उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे प्रश्न उपस्थित करण्यासाठी लाच घेतली, असा आरोप दुबे यांनी केला आहे.

दुबे यांनी असेही सांगितले आहे की, महुआ मोर्इत्रा भारतात असताना त्यांच्या संसदेच्या ओळखपत्राचा दुबर्इत वापर झाला होता. याची माहिती नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर (एनआयसी) या संस्थेने ही माहिती तपास यंत्रणांना दिली आहे. यामुळे संतापलेल्या तृणमूलच्या नेत्यांनी आरोप फेटाळले असून निव्वळ खोटारडेपणा असल्याचे म्हटले आहे. ती सतत अदानी समूहाचे पितळ उघडे पाडत असल्यामुळे तिला लक्ष्य करण्यात आले आहे, असे तृणमूल नेत्याचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in