कारला धडक देऊन ज्येष्ठ वकिलाची हत्या; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने मंगळवारी हैदराबादमधील ज्येष्ठ वकील खाजा मोईझुद्दीन यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध केला आणि गुन्हेगारांना न्यायपीठासमोर आणण्यासाठी ‘निष्पक्ष, जलद आणि सखोल तपासाची’ मागणी केली.
कारला धडक देऊन ज्येष्ठ वकिलाची हत्या; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध
कारला धडक देऊन ज्येष्ठ वकिलाची हत्या; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध
Published on

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने मंगळवारी हैदराबादमधील ज्येष्ठ वकील खाजा मोईझुद्दीन यांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध केला आणि गुन्हेगारांना न्यायपीठासमोर आणण्यासाठी ‘निष्पक्ष, जलद आणि सखोल तपासाची’ मागणी केली.

२३ मे रोजी एका एसयूव्ही कारमधील अज्ञात हल्लेखोरांनी चिरडल्याचा आरोप झाल्यानंतर ज्येष्ठ वकील खाजा मोईझुद्दीन यांचा मृत्यू झाला होता.

ज्येष्ठ वकील विकास सिंह यांच्या अध्यक्षतेखालील सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने निवेदन जारी करत म्हटले की, ‘बार असोसिएशनच्या सदस्याचा मृत्यू कारणीभूत ठरणारा हा हल्ला केवळ एका व्यक्तीविरुद्धचा गुन्हा नसून न्यायव्यवस्थेवरच झालेला हल्ला आहे.

एससीबीएच्या सचिव प्रज्ञा बघेल यांनी सांगितले की, हा मृत्यू ज्येष्ठ वकिलाची नियोजित, क्रूर आणि धक्कादायक हत्या असल्यासारखा दिसतो. या घटनेमुळे विधी क्षेत्राला मोठा धक्का बसला असून, व्यावसायिक कर्तव्ये बजावणाऱ्या वकिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे... वकिली हा न्यायदान व्यवस्थेचा एक आवश्यक स्तंभ आहे आणि वकिलांविरुद्धची कोणतीही हिंसक कृती कायद्याच्या राज्याच्या पायावरच आघात करते,' असे या निवेदनात म्हटले आहे.

खाजा मोईझुद्दीन हैदराबादमधील मसाब टँक येथील त्यांच्या निवासस्थानी आपल्या कारमध्ये बसणारच होते, तितक्यात नंबर प्लेट नसलेल्या एका एसयूव्ही कारने त्यांना धडक दिली. मोईझुद्दीन यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in