आसाराम बापूला दिलासा नाहीच, याचिका न्यायालयाने फेटाळली

खोपोलीतील माधवबाग हार्ट हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे अशी सरकारी वकिलांनी केलली सूचना मान्य करण्याची तयारी आसाराम बापूने दर्शविली असल्याचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले. तेव्हा...
आसाराम बापूला दिलासा नाहीच, याचिका न्यायालयाने फेटाळली
Published on

नवी दिल्ली : प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी स्वयंघोषित तांत्रिक आसाराम बापू याने केलेली याचिका शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

आसाराम बापू याला बलात्काराच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आसाराम बापू याने खोपोलीतील माधवबाग हार्ट हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे अशी सरकारी वकिलांनी केलली सूचना मान्य करण्याची तयारी आसाराम बापूने दर्शविली असल्याचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले. तेव्हा राजस्थान उच्च न्यायालयात दाद मागावी, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्त यांच्या पीठाने त्यांना सांगितले. आसाराम याने राजस्थान उच्च न्यायालयात दाद मागून माधवबाग हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार करण्याची परवानगी मागावी आणि त्याचा कायद्यानुसार विचार व्हावा, असेही पीठाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in