नवी दिल्ली : तामिळनाडूच्या थूथुकुडी येथील तांबे वितळविण्याचा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची वेदांत लिमिटेडची याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
स्थानिक रहिवाशांचे आरोग्य व कल्पाण यांचे महत्त्व अधोरेखित करीत ही याचिका फेटाळून वेदांतला झटका दिला आहे. सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाच्या १८ ऑगस्ट २०२० च्या निकालाविरुद्ध वेदांताची विशेष रजा याचिका (स्पेशल लीव्ह पीटिशन) फेटाळून लावली.