स्वतंत्र राहायचे असल्यास विवाह करू नका! सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

कोणाला स्वतंत्र राहायचे असल्यास त्यांनी विवाह करू नये. जोपर्यंत वैवाहिक संबंध आहेत. तोपर्यंत पती किंवा पत्नीने दुसऱ्या जीवनसाथीपासून स्वतंत्र राहू इच्छितो किंवा इच्छिते असे म्हणू नये. कारण विवाह म्हणजे दोन ह्रदय, व्यक्तींचे एकत्र येणे होय. तुम्ही स्वतंत्र कसे असू शकता, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली.
स्वतंत्र राहायचे असल्यास विवाह करू नका! सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Published on

नवी दिल्ली : कोणाला स्वतंत्र राहायचे असल्यास त्यांनी विवाह करू नये. जोपर्यंत वैवाहिक संबंध आहेत. तोपर्यंत पती किंवा पत्नीने दुसऱ्या जीवनसाथीपासून स्वतंत्र राहू इच्छितो किंवा इच्छिते असे म्हणू नये. कारण विवाह म्हणजे दोन ह्रदय, व्यक्तींचे एकत्र येणे होय. तुम्ही स्वतंत्र कसे असू शकता, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका दाम्पत्याच्या याचिकेवर सुनावणी केली.

विवाहानंतर पती किंवा पत्नी सांगू शकत नाहीत की, आम्ही आपल्या जीवनसाथीसोबत स्वतंत्र राहू इच्छितो. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. पती सिंगापूरला राहतो, तर पत्नी भारतात राहते. पत्नीचे म्हणणे आहे की, मी पतीवर निर्भर राहू इच्छित नाही. त्यावर न्या. बी. व्ही. नागरत्ना म्हणाल्या की, मी जुन्या विचारांची आहे. पण, कोणतीही पत्नी हे म्हणून शकत नाही की, मी पतीवर निर्भर राहू इच्छित नाही. ते दोघे एकत्र राहिल्यास आम्हाला आनंद होईल. कारण तुमची मुले खूप लहान आहेत. त्यांना फुटलेले घर पाहायला मिळू नये. कारण त्यांचा दोष काय आहे? तुमच्यात कोणतेही मतभेद असतील ते तुम्ही सोडवा. प्रत्येक पती-पत्नीत कोणता ना कोणता वाद असतोच. त्यावर याचिकादार पत्नीने सांगितले की, टाळी एका हाताने वाजत नाही. खंडपीठाने सांगितले की, आम्ही दोघांना निर्देश दिले आहेत, एकाला नाही.

पत्नीने सांगितले की, माझा पती सिंगापूरला होता. आता तो भारतात आहे. तो हे प्रकरण सोडवायला तयार नाही. तो केवळ मुलांना भेटण्याचा अधिकार व मुलांचे संरक्षण आदींची मागणी करतो.

कोर्टाने महिलेला विचारले की, तुम्ही सिंगापूरला पतीकडे का जात नाही. तुम्हाला मुलांना घेऊन जाण्यास काय अडचण आहे. तेव्हा याचिकादार महिलेने सांगितले की, पतीच्या वागण्यामुळे त्याच्याकडे परत जाणे जिकिरीचे बनले आहे. मी एकल पालक आहे. त्यामुळे मला मुलांचे पालनपोषण करायला नोकरीची गरज आहे. मला पतीकडून कोणतीही पोटगी मिळत नाही. तेव्हा न्यायालयाने पत्नी व मुलांचे पालनपोषण करण्यासाठी काही ठरावीक रक्कम देण्याची सूचना पतीला केली.

त्यावर पत्नीने कोर्टाला सांगितले की, ती कोणावरही निर्भर राहू इच्छित नाही. तेव्हा न्या. नागरत्ना म्हणाल्या की, तुम्ही असे करू शकत नाही. लग्नानंतर तुम्ही आर्थिक नसल्या तरीही भावनात्मकरित्या आपल्या पतीवर निर्भर असता. मी कोणावरही निर्भर राहू शकत नाही, हे तुम्ही म्हणू शकत नाही. मग तुम्ही लग्न का केले? कोणतीही पत्नी आपल्या पतीवर निर्भर राहू शकत नाही, हे सांगू शकत नाही. त्यानंतर त्या महिलेने या मुद्यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला.

तुम्हाला हे मुद्दे सोडवावे लागतील

खंडपीठाने सांगितले की, तुम्ही सर्वजण सुशिक्षित आहात. त्यामुळे तुम्हाला हे मुद्दे सोडवावे लागतील. पत्नी व मुलांच्या पालनपोषणासाठी ५ लाख रुपये जमा करावेत, असे निर्देश न्यायालयाने पतीला दिले व या प्रकरणाची सुनावणी १६ सप्टेंबरपर्यंत स्थगित केली.

logo
marathi.freepressjournal.in