पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करा; केंद्र, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधि आयोगाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी राजीनाम्यांचा गैरवापर करीत असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.
पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करा; केंद्र, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करा; केंद्र, निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
Published on: 

नवी दिल्ली : पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विधि आयोगाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले. अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी राजीनाम्यांचा गैरवापर करीत असल्याचा मुद्दा याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने विधी व न्याय मंत्रालय आणि संसदीय कामकाज मंत्रालयालाही नोटीस बजावली. ए. सेथू यांनी दाखल केलेल्या याचिकेत, लोकप्रतिनिधींना संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतरबंदी तरतुदींना बगल देण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. राजीनामे आणि अपात्रतेच्या प्रकरणांचा वेळबद्ध, पारदर्शक व कारणांसह निर्णय व्हावा, तसेच अध्यक्षकेंद्रित निर्णयप्रक्रियेचा संस्थात्मक आढावा घ्यावा, अशी मागणी याचिकेत केली आहे.

त्रिशंकू विधानसभेत सरकार स्थापनेसाठी बहुमताची चाचणी शपथ घेतलेल्या सदस्यांसह कायद्याने स्थापन झालेल्या सभागृहातच व्हावी, असेही याचिकेत म्हटले आहे. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना किंवा नियोजित असताना लोकप्रतिनिधीच्या राजीनाम्यामुळे अपात्रता प्रक्रिया संपुष्टात आणू नये, असे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)