सरन्यायाधीशांकडून दोन नवीन न्यायाधीशांना शपथ

सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी शुक्रवारी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ दिली.
सरन्यायाधीशांकडून दोन नवीन न्यायाधीशांना शपथ
Published on

नवी दिल्लीः सरन्यायाधीश भूषण आर. गवई यांनी शुक्रवारी बॉम्बे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश विपुल मनुभाई पंचोली यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाची शपथ दिली.

या दोघांची २७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात बढती करण्यात आली होती. त्यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ३४ झाली आहे.

न्या. पंचोली यांना २ ऑक्टोबर २०३१ रोजी न्या. जॉयमाला बागची यांच्या निवृत्तीनंतर ३ ऑक्टोबर २०३१ रोजी सरन्यायाधीशपद मिळणार असून ते २७ मे २०३३ पर्यंत कार्यरत राहतील.

२५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने आराधे आणि पंचोली यांची नावे सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशपदी बढतीसाठी केंद्र सरकारला शिफारस केली होती. मात्र, कॉलेजियमच्या सदस्य व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी पंचोली यांच्या नियुक्तीबाबत ठाम असहमती नोंदवली. त्यांनी म्हटले की त्यांची नियुक्ती न्यायव्यवस्थेसाठी "उलट परिणाम करणारी" ठरेल.

सर्वोच्च न्यायालयातील एकमेव महिला न्यायाधीश असलेल्या नागरत्ना यांनी अनेक मुद्द्यांवर आपला विरोध नोंदवत म्हटले की त्यांची नियुक्ती पुढे नेल्यास "कॉलेजियम प्रणालीकडे उरलेला विश्वासही कमी होईल".

logo
marathi.freepressjournal.in