गृहिणी म्हणजे ‘राष्ट्रनिर्मात्या’; त्यांच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३० हजार रुपये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

गृहिणींच्या अविरत कष्टांना आणि योगदानाला मानाचा मुजरा देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक ऐतिहासिक निकाल दिला आहे.
गृहिणी म्हणजे ‘राष्ट्रनिर्मात्या’; त्यांच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३० हजार रुपये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
गृहिणी म्हणजे ‘राष्ट्रनिर्मात्या’; त्यांच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३० हजार रुपये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : गृहिणींच्या अविरत कष्टांना आणि योगदानाला मानाचा मुजरा देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. गृहिणींना ‘राष्ट्रनिर्मात्या’ म्हणून ओळखले पाहिजे, असे स्पष्ट करत न्यायालयाने म्हटले आहे की, अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यास तिच्या घरगुती काळजी आणि सेवांचे मूल्य किमान ३०,००० रुपये प्रतिमहिना गृहित धरून नुकसानभरपाई निश्चित केली जावी.

मोटार वाहन कायद्याशी संबंधित प्रकरणांवर या निर्णयाचा व्यापक परिणामहोणार आहे. न्या. संजय करोल आणि न्या. एन. कोटिश्वर सिंग याच्या खंडपीठाने एका रस्ते अपघातात पत्नी गमावलेल्या व्यक्तीला अतिरिक्त नुकसानभरपाई मंजूर करताना हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.

यापूर्वी, अपघातात मृत्यू झालेल्या गृहिणींची नुकसानभरपाई ठरवताना, तत्कालीन किमान वेतनाच्या आधारे एक काल्पनिक उत्पन्न निश्चित केले जात असे. यामध्ये त्यांना अकुशल किंवा अर्धकुशल कामगारांच्या बरोबरीने गृहीत धरले जायचे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या नव्या शिक्षणामुळे आता हा निकष बदलून किमान ३०,००० रुपये प्रतिमहिना मूल्याचा नवीन पाया तयार झाला आहे.

पंजाबमधील एका रस्ते अपघातात २५ नोव्हेंबर २००१ रोजी एका महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या पतीने आणि तीन मुलांनी नुकसानभरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली होती. 'मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने' त्यांना २.४२ लाख रुपये मंजूर केले होते. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने ही रक्कम वाढवून ८.४३ लाख रुपये केली. मात्र, यावरही असमाधानी असलेल्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, ज्यावर सुनावणी करताना न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

गृहिणी म्हणजे ‘राष्ट्रनिर्मात्या’; त्यांच्या योगदानाचे मूल्य दरमहा किमान ३० हजार रुपये, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
शौचालयांच्या अभावी मुलींचे शिक्षण सुटू नये - सर्वोच्च न्यायालय

१ वर्षात निर्णय घ्या!

मोटार अपघात भरपाईच्या दाव्यांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने असे खटले एका वर्षाच्या आत निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांवर देखरेख ठेवण्याचे निर्देश सर्व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींना देण्यात आले आहेत. जे खटले ४ वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित आहेत, त्यांना प्राधान्य क्रमाने सूचीबद्ध करण्यात यावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

गृहिणी म्हणजे राष्ट्रनिर्मात्या

सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, गृहिणी ही माणसाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या विकासात मोठे योगदान देते. गृहिणी खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे काम करते. खंडपीठाने म्हटले, गृहिणीला कमावत्या सदस्यांवर 'अवलंबून' मानणे हा एक विरोधाभास आहे. वास्तविक पाहता, संपूर्ण घराचे कामकाज गृहिणीवरच चालते. घरातील कमावणारे सदस्यच उलट तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असतात. दुर्दैवाने या वास्तवाला समाजात हक्काची मान्यता मिळत नाही. यापुढे 'हाऊसवाईफ' किंवा 'गृहिणी' या शब्दांऐवजी त्यांच्या सन्मानार्थ 'राष्ट्रनिर्मात्या' हा शब्द वापरला जावा, अशी आशाही न्यायालयाने व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in