राहुल गांधींविरोधातील चौकशीचे आदेश रद्द

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांची सीबीआय आणि ईडीमार्फत पडताळणी करण्याचे निर्देश देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला.
राहुल गांधींविरोधातील चौकशीचे आदेश रद्द
राहुल गांधींविरोधातील चौकशीचे आदेश रद्द
Published on: 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांची सीबीआय आणि ईडीमार्फत पडताळणी करण्याचे निर्देश देणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. भाजप सदस्य विग्नेश शिशिर यांनी दाखल केलेली याचिका नव्याने विचारार्थ उच्च न्यायालयाकडे पाठवली. याचिकेच्या ग्राह्यतेचाही विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढील कार्यवाही करू नये, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाला सांगितले होते. तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कोणताही अहवाल सादर करू नये, असे सीबीआय आणि ईडीलाही बजावले होते.

उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर असमाधान व्यक्त करत, तक्रारीवरील तपासाच्या प्रगतीचा तपशील नव्याने सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी सीबीआयच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या संबंधित संयुक्त संचालकांना किंवा विभागप्रमुखांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. दरम्यान, याचिकाकर्त्याने राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व असल्याचाही आरोप केला होता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)