निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

सरकारने दोन नव्या निवडणूक आयुक्तांच्या केलेल्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, स्थगितीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : सरकारने दोन नव्या निवडणूक आयुक्तांच्या केलेल्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. निवडणूक आयुक्त निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळून ही प्रक्रिया करण्यात आल्याचा आक्षेप याप्रकरणी घेण्यात आला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठीची बैठक पूर्वनियोजित होती, असे अर्जदारांचे म्हणणे होते. न्या. संजीव खन्ना, न्या, दीपांकर दत्त आणि न्या. ऑगस्टिन मसीह यांच्या पीठाने अर्जदारांना वस्तुस्थिती दर्शविणारा स्वतंत्र अर्ज सादर करण्यास सांगितले आहे.

प्रचलित पद्धतीनुसार आम्ही अंतरिम आदेशानुसार कायद्याला स्थगिती देत नाही. दोन निवडणूक आयुक्तांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर २१ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे, असेही पीठाने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in