‘नीट’बाबतचे समुपदेशन सुरू राहणार; सुप्रीम कोर्टाचे आदेश

वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतरचे समुपदेशनास परवानगी नाकारण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नकार दिला.
‘नीट’बाबतचे समुपदेशन सुरू राहणार; सुप्रीम कोर्टाचे आदेश
Published on

नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‘नीट’ परीक्षेनंतरचे समुपदेशनास परवानगी नाकारण्यास सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी नकार दिला. ६ जुलैपासून ‘नीट’ विद्यार्थ्यांचे समुपदेशन सुरू होणार आहे. तसेच ही परीक्षा रद्द करण्याच्या याचिकांबाबत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय चाचणी संस्थेला (एनटीए) नोटीस बजावली आहे.

सुप्रीम कोर्टाचे न्या. विक्रम नाथ व न्या. एसव्हीएन भट्टी यांनी ‘नीट’बाबतच्या प्रलंबित याचिकांवर ८ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे ठरवले. सुप्रीम कोर्ट ८ जुलैपासून ‘नीट’च्या सर्व याचिकांवर सुनावणी करणार आहे. त्यामुळे समुपदेशनाची प्रक्रियाही ८ जुलैपासून सुरू करावी, अशी मागणी याचिकादारांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाकडे केली. त्यावर न्यायालयाने या समुपदेशनास स्थगिती देण्यास नकार दिला. समुपदेशन ही प्रक्रिया आहे. त्यामुळे ती ६ जुलैपासून सुरूच राहणार आहे. तसेच यावेळी एनटीए, केंद्र सरकार व अन्य याचिकांदारांना त्यांचे म्हणणे दोन आठवड्यांत मांडण्यास सांगितले आहे.

logo
marathi.freepressjournal.in