के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना जामीन मंजूर करण्यास नकार
के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांना जामीन मंजूर करण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

कविता यांनी प्रथम कनिष्ठ न्यायालयात दाद मागावी, आपल्याकडे तशीच प्रथा आहे, न्यायालय त्याचाच अवलंब करीत आहे, या शिष्टाचाराकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे न्या. संजीव खन्ना, न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. बेला त्रिवेदी यांच्या पीठाने म्हटले आहे. पीएमएलए तरतुदींना कविता यांनी आव्हान दिले आहे, त्याचा विचार करून आम्ही ईडीवर नोटीस बजावत असून त्याला सहा आठवड्यांमध्ये उत्तर द्यावे, असे पीठाने म्हटले आहे. तरतुदींना आव्हान देणारी याचिका प्रलंबित प्रश्नांसोबतच सुनावणीसाठी घेतली जाईल, असे न्यायालयाने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in