नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानहून आणण्याची याचिका फेटाळली; वारसाला न्यायालयात यावे लागेल, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून परत आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानहून आणण्याची याचिका फेटाळली; वारसाला न्यायालयात यावे लागेल, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमधून परत आणण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणायच्या असतीत तर त्यांच्या वारसाला न्यायालयात यावे लागेल, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यासंदर्भात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आशिष रे यांनी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना, जर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वारसांना अस्थी देशात आणायच्या असतील तर त्यांनी स्वतः पुढे यावे, असे सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. तसेच सर्वोच्च न्यायालयानं असेही नमूद केले की, "आम्ही त्यांच्या भावनांचा आदर करतो आणि त्यांच्या भावना कायदेशीर कारवाईत रूपांतरित होतील, याची आम्ही खात्री करू."

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. विपुल एम. पंचोली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी आशिष रे यांच्या वतीने वरिष्ठ वकील अभिषेक सिंघवी उपस्थित राहिले. सुनावणीदरम्यान, सिंघवी यांनी खंडपीठाला माहिती दिली की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस या न्यायालयीन सुनावणीला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहत आहेत आणि त्या याचिकेला पाठिंबा देत आहेत.

दरम्यान, अशाच प्रकारच्या याचिका यापूर्वीही दाखल करण्यात आल्या होत्या आणि त्या फेटाळून लावण्यात आल्या होत्या, असे खंडपीठाने निदर्शनास आणून दिले. तसेच सरन्यायाधीशांनी हा मुद्दा न्यायालयासमोर किती वेळा येईल, असे विचारले. यावर सिंघवी यांनी सांगितले की, हा तो मुद्दा नाही. खंडपीठाने म्हटले की, "अप्रत्यक्ष, प्रत्यक्षपणे ही याचिका पुन्हा का येत आहे, सर्वप्रथम अस्थी कुठे आहेत, त्याबाबतचा पुरावाकाय आहे?

नेताजींची एकमेव वारस मुलगी आहे, जी आता ८४ वर्षांची आहे आणि ऑन स्कीन आहेत, असे सिंघवी यांनी सांगितले. तसेच भारतातील प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने जपानमधील रेंकोजी मंदिरात नेताजींच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली आहे, ज्या तेथे जतन केल्या आहेत, असे सिंघवी म्हणाले. सरन्यायाधीश म्हणाले, "सर्वात आधी आम्हाला जाणून घ्यायचे आहे की, कुटुंबातील किती सदस्य जिवंत आहेत. नेताजींना एकच मूल आहे आणि त्यांच्या एकमेव वारस सुश्री अनिता आहेत, ज्या ऑस्ट्रियामध्ये राहतात." तर न्या. बागची यांनी त्या याचिकाकर्ता नाही आहेत असे सांगत म्हटले की, "वारसाला आमच्यासमोर येऊ द्या... जर वारसाला अस्थी आपल्या देशात आणायच्या असतील तर वारसाला आमच्यासमोर हजर राहावे लागेल.

logo
marathi.freepressjournal.in