रेड्डींवरील खटला अन्यत्र हलवण्याची विनंती फेटाळली

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी यांच्याविरुद्ध सुरू असलेला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणीचा खटला आंध्र प्रदेश व तेलंगणाबाहेर हलवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
रेड्डींवरील खटला अन्यत्र हलवण्याची विनंती फेटाळली
Published on

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएसआर जगन मोहन रेड्डी यांच्याविरुद्ध सुरू असलेला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणीचा खटला आंध्र प्रदेश व तेलंगणाबाहेर हलवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.

आंध्र प्रदेशचे उपसभापती रघुराम कृष्ण राजू (तेलुगु देसम पक्षाचे) यांनी राज्य यंत्रणा माजी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने असल्याचा आरोप करत खटला अन्यत्र हलवण्याची विनंती केली होती. त्यावर न्या. बीव्ही नागरत्ना व न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने नमूद केले की, उच्च न्यायालय हा खटला सीबीआय न्यायालयामार्फत दैनंदिन सुनावणीसाठी हाताळत असल्याने हा खटला अन्यत्र हलवणे गरजेचे नाही.

logo
marathi.freepressjournal.in