सनातन धर्मावरील वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

आता तुम्ही तुमच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले सर्व एफआयआर एकत्रित करण्याची मागणी करणारी याचिका घेऊन न्यायालयात का आला आहात
सनातन धर्मावरील वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली : सनातान धर्माचे निर्मूलन करावे, असे वक्तव्य करणारे तामिळनाडूचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. भाषा आणि विचारस्वातंत्र्याच्या आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्यानंतर आता तुम्ही तुमच्याविरुद्ध नोंदविण्यात आलेले सर्व एफआयआर एकत्रित करण्याची मागणी करणारी याचिका घेऊन न्यायालयात का आला आहात, अशी विचारणा न्यायालयाने केली.

आपण एक जबाबदार मंत्री आहात, कोणतेही वक्तव्य करताना ते काळजीपूर्वक केले पाहिजे, आपल्या वक्तव्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याचेही भान ठेवले पाहिजे, असे न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्त यांच्या पीठाने उदयनिधी यांना बजावले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in