मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर आजपासून लोकसभेवर चर्चा सुरु झाली आहेत. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांनी या प्रस्तावावर चर्चा सुरु केली आहे. संसदेत तीन दिवस अविश्वास प्रस्तावावर १८ तास चर्चा पार पडणार आहे. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देणार आहेत.
विरोधी पक्षांनी केंद्र सरकार विरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यावेळी त्यांनी मणिपूरमध्ये नग्न धिंड काढलेल्या महिलांचा मुद्धा उपस्थित करत हे कसं सहन करायचं असा सवाल केला. यावेळी सुळे यांनी मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी केली. नग्न महिलांची धिंड काढल्याप्रकरणी आक्रमक होत मोदी सरकारला याबाबत काहीच वाटत नाही का? त्या भारताच्या मुली नाहीत का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपने ९ वर्षात ९ सरकारे पाडली. भाजपच्या काळात महागाई वाढली. हे सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरलं आहे. तसंच वंदे भारत ही ट्रेन गरिबांसाठी नाही. मी वंदे भारत्या विरोधात नाही. मात्र, हे सत्य नाकारता येत नाही. असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.