सुप्रिया सुळे कडून मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

९ वर्षात भाजपने देशातील ९ सरकार पाडली असल्याचा आरोप देखील सुळे यांनी भाजप पक्षावर केला
सुप्रिया सुळे कडून मणिपूर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लोकसभेत अविश्वासदर्शक ठरावावर भाषण करतांना मणिपूर मधील परिस्थिती अत्यंत लाजीवरवाणी असून तेथे घोडचूका होत असून त्यामुळे १५० पेक्षा अधिकांनी जीव गमावला असल्याचे नमूद केले. त्यामुळे मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा अशी त्यानी जोरदार मागणी केली. तसेच गेल्या ९ वर्षात भाजपने देशातील ९ सरकार पाडली असल्याचा आरोप देखील सुळे यांनी भाजप पक्षावर केला. त्यांना उत्तर देतांना भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या वडिलांचे सरकार कॉंग्रेसनेच पाडले होते याची आठवण करुन दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in