मोठी बातमी! सुरत न्यायालयाने फेटाळली राहुल गांधींची 'ती' याचिका; अडचणीत होणार वाढ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुनावल्या शिक्षेविरोधात केली होती याचिका, आता काँग्रेस पुढे काय पाऊले उचलणार? याकडे साऱ्यांचे लक्ष
मोठी बातमी! सुरत न्यायालयाने फेटाळली राहुल गांधींची 'ती' याचिका; अडचणीत होणार वाढ

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांनी शिक्षेला स्थगिती देण्याची केलेली याचिका सुरत सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार असून आता काँग्रेस पुढे काय पाऊले टाकणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मोदी आडनाव मानहानीचा खटल्यात त्यांना २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांची खासदारकी रद्द करून लोकसभेचे सदस्यपद रद्द करण्यात आले होते. काँग्रेस या निर्णयाविरोधात उच्चं न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९ साली केलेल्या एका भाषणात मोदी आडनावाविषयी बदनामीकारक भाष्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याविरेाधात सुरत येथील दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. २३ मार्च रोजी या खटल्याचा निकाल देताना मुख्य दंडाधिकारी एच. एच. वर्मा यांनी राहुल गांधी यांना भारतीय दंड संहिता कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत दोषी ठरवून दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली होती. परिणामी कायद्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in