गुजरातमध्ये ‘जुनं फर्निचर’ची कथा! मुलाने संपर्क तोडल्याने आई-वडिलांची आत्महत्या;आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

सध्या मराठी चित्रपट ‘जुनं फर्निचर’ हा गाजत आहे. तरुण मुला-मुलींकडून वृध्द आई-वडिलांची होणारी ससेहोलपट यात चित्रीत केली आहे.
मुलाने संपर्क तोडल्याने वृद्ध आई-वडिलांनी केली आत्महत्या
मुलाने संपर्क तोडल्याने वृद्ध आई-वडिलांनी केली आत्महत्या X (@LetsTalkSurat)

सुरत : सध्या मराठी चित्रपट ‘जुनं फर्निचर’ हा गाजत आहे. तरुण मुला-मुलींकडून वृध्द आई-वडिलांची होणारी ससेहोलपट यात चित्रीत केली आहे. सुरतमधील एका दाम्पत्याचा मुलगा चार वर्षांपूर्वी कॅनडात गेला. मुलाचे कर्ज फेडण्यासाठी पालकांनी ४० लाख रुपये कर्ज काढले. पालकांचे कर्ज फेडायचे दूरच, त्याने चार वर्षे आपल्या जन्मदात्यांशी संपर्क साधणेही टाळले. अखेर मुलाच्या वागणुकीला कंटाळून आई-वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली. या करणी पोलिसांनी तपास सुरू केला.

सुरतच्या चुनीभाई गेडिया (६६) आणि त्यांची पत्नी मुक्ताबेन गेडिया (६४) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. चुनीभाई यांचा मुलगा पियुष याला व्यवसायात अपयश आले. त्याच्यावर ४० लाखांचे कर्ज झाले. पालकांनी नातेवाईकांकडून पैसे घेऊन कर्ज फेडले. यानंतर पियुष कॅनडाला स्थायिक झाला. त्याने आई-वडिलांकडे पूर्ण पाठ फिरवली. आर्थिक मदत तर दूरच, तो संपर्कही ठेवत नव्हता. मुलगा आपल्याला जवळ करत नसल्याचे दु:ख त्यांना छळत होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

मरणापूर्वी पालकांनी मुलगा पियुषच्या नावाने आत्महत्यापूर्व चिठ्ठी लिहिली. आमच्या मुलाने व सूनेने आमच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावर पैसे खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच मुलगा व सुनेने केलेल्या वाईट वागणुकीचा पाढाच या चिठ्ठीत नमूद केला आहे. माझ्यावर ४० लाखांचे कर्ज असून त्याची परतफेड करू शकत नाही. मी आज ६६ वर्षांचा असल्याने कामही करू शकत नाही. त्यामुळेच मी हे पाऊल उचलत आहे. माझे सर्व दागिने आणि माझे पैसे मी त्याला दिले, पण त्याने पाठ फिरवली.

पियुष गेल्या ४ वर्षांपासून कॅनडात राहत आहे. या काळात त्याने मला एकदाही फोन केला नाही. मी पियुषला दोनदा व्हिडिओ कॉल केला, पण त्याने फोन उचलला नाही. कर्जदार माझ्यावर कोणताही दबाव टाकत नाहीत. मी माझ्या मित्रांचा आणि नातेवाईकांचा ऋणी आहे, पण आता मला लाज वाटते, असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in