नैसर्गिक शेतीमध्ये सूरतचे यश एक आदर्श ठरणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले
नैसर्गिक शेतीमध्ये सूरतचे यश एक आदर्श ठरणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आजचा हा कार्यक्रम म्हणजे कशा प्रकारे अमृतकाळाची लक्ष्ये साध्य करण्याच्या देशाच्या संकल्पाचे गुजरात नेतृत्व करत आहे त्याचे उदाहरण आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ७५ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी जोडण्याचे सूरतचे यश संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे”, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्यांनी यामध्ये सरपंचांची भूमिका अधोरेखित केली आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने शेतकऱ्यांना पुढे नेल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नैसर्गिक शेती परिसंवादामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. गुजरातमध्ये सूरत येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये हजारो शेतकरी आणि सूरतमध्ये नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून यशस्वी झालेले इतर सर्व हितधारक सहभागी झाले आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल देखील या परिसंवादात सहभागी झाले होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने देश अनेक लक्ष्ये साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे आणि येणाऱ्या काळात त्यामुळे खूप मोठे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. देशाच्या प्रगतीचा पाया आणि वेग यामागे ‘ सबका प्रयास’ ची भावना आहे आणि आपल्या विकासाच्या यात्रेचे ती नेतृत्व करत आहे, असे ते म्हणाले. म्हणूनच गरिबांच्या आणि वंचितांच्या कल्याणाच्या योजनांमध्ये ग्राम पंचायतींना महत्त्वाची भूमिका सोपवली आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक पंचायतीमधून ७५ शेतकऱ्यांची निवड केली आणि त्यांना प्रशिक्षण आणि इतर संसाधनांची मदत करत ठोस भूमिका बजावली.त्यामुळे ५५० पंचायतींमधील ४० हजारांहून अधिक शेतकरी नैसर्गिक शेतीत गुंतले आहेत,असे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे.ही एक उत्तम सुरुवात असून अतिशय उत्साहवर्धक आहे. नैसर्गिक शेतीचे हे सुरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श ठरू शकते, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.

जेव्हा लोकसहभागाच्या बळावर मोठे प्रकल्प हाती घेतले जातात तेव्हा त्यांच्या यशाची खात्री देशातील जनताच घेते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी 'जल जीवन मिशन' प्रकल्पाचे उदाहरण दिले जिथे लोकांना महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे “डिजिटल इंडिया मिशनचे अभूतपूर्व यश हे खेडेगावात बदल घडवणे सोपे नाही असे म्हणणाऱ्यांना देशानेच दिलेले उत्तर आहे. आमच्या गावखेड्यांनी दाखवून दिले आहे की खेडी केवळ बदल घडवून आणू शकत नाहीत तर बदलाचे नेतृत्वही करू शकतात.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in