रिझर्व्ह बँकेकडून उत्पादन कंपन्यांचे सर्वेक्षण

सर्वेक्षणाची पुढील ६५ वी फेरी जानेवारी-मार्च २०२४ (२०२३-२४च्या चौथी तिमाही) संदर्भ कालावधीसाठी आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँक २००८ पासून तिमाही आधारावर उत्पादन क्षेत्रातील ऑर्डर बुक्स, इन्व्हेंटरीज आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन सर्वेक्षण करते.
रिझर्व्ह बँकेकडून उत्पादन कंपन्यांचे सर्वेक्षण
Published on

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने उत्पादन कंपन्यांच्या तिमाही ऑर्डर नोंदणीची सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात ऑर्डरची नोंदणी, उत्पादनात वाढ आणि उत्पादन क्षमतेचा वापर आदींचा आढावा घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणानुसार आगामी पतधोरण तयार करण्यासाठी आधार घेण्यात येणार आहे.

सर्वेक्षणाची पुढील ६५ वी फेरी जानेवारी-मार्च २०२४ (२०२३-२४च्या चौथी तिमाही) संदर्भ कालावधीसाठी आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँक २००८ पासून तिमाही आधारावर उत्पादन क्षेत्रातील ऑर्डर बुक्स, इन्व्हेंटरीज आणि कॅपॅसिटी युटिलायझेशन सर्वेक्षण करते.

सर्वेक्षणात संकलित केलेल्या माहितीमध्ये संदर्भ तिमाही दरम्यान प्राप्त झालेल्या नवीन ऑर्डर्सवरील परिमाणात्मक आकडेवारी, तिमाहीच्या सुरुवातीला ऑर्डरचा अनुशेष आणि तिमाहीच्या शेवटी प्रलंबित ऑर्डरचा समावेश असतो.

त्रैमासिकाच्या शेवटी नवे उत्पादन, वर्क-इन-प्रोग्रेस (काम किती सुरू आहे) आणि कच्चा मालसह एकूण आकडेवारी संकलित करते. प्रमाण आणि मूल्याच्या दृष्टीने वस्तूनुसार उत्पादनाचा आढावा घेतला जातो. कंपन्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून उत्पादन क्षमता वापराच्या पातळीचा अंदाज लावला जातो.

सर्वेक्षणातून पतधोरण तयार करण्यासाठी मौल्यवान माहिती मिळते, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सर्वेक्षणाचे निष्कर्ष आरबीआयद्वारे प्रकाशित केले जात असताना ते कंपनीकडून मिळणारी आकडेवारी गोपनीय ठेवली जाते आणि कधीही उघड केली जात नाही. पुढील द्वै-मासिक पतधोरणविषयक समितीची बैठक ५ ते ७ जून २०२४ या कालावधीत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in