महादेव ॲप फसवणूक प्रकरणातील ‘तो’ निलंबित हवालदार बडतर्फ

३ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी अटक केली होती
महादेव ॲप फसवणूक प्रकरणातील ‘तो’ निलंबित हवालदार बडतर्फ

दुर्ग : कोट्यवधी रुपयांच्या सट्टेबाजीच्या महादेव ॲप फसवणुकीप्रकरणी अटक झाल्यानंतर यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या छत्तीसगड पोलिसांच्या एका हवालदाराला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, असे दुर्गचे पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी जारी केलेल्या आदेशानुसार स्पष्ट झाले आहे. सुपेला पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल भीम सिंह यादव यांना ॲपच्या संबंधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग चौकशीदरम्यान गुरुवारी बडतर्फ केले, असे या संबंधात अधिकाऱ्याने सांगितले. यादव आणि पैसे वाहून नेणारा कुरिअर असीम दास यांना फेडरल एजन्सीने ३ नोव्हेंबर २०२३ रोजी छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी अटक केली होती. ईडीने यापूर्वी म्हटले होते की, बेटिंग ॲपद्वारे निर्माण केलेल्या कथित बेकायदेशीर निधीचा वापर राज्यातील राजकारणी आणि नोकरशहांना लाच देण्यासाठी केला जात होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in