जेनेरिक औषधांच्या अधिसूचनेला स्थगिती

नियम २०२३ याद्वारे तात्काळ प्रभावाने स्थगित ठेवण्यात आले आहेत
जेनेरिक औषधांच्या अधिसूचनेला स्थगिती

नवी दिल्ली : सर्व डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देणे बंधनकारक करणारी आणि तसे न केल्यास डॉक्टरांचा परवाना रद्द करण्याच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नव्या नियमावलीला स्थगिती देण्यात आली आहे.

भारतीय वैद्यकीय असोसिएशनने या निर्णयाला विरोध केल्यानंतर आता त्याला स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी (व्यावसायिक आचार) नियम २०२३ याद्वारे तात्काळ प्रभावाने स्थगित ठेवण्यात आले आहेत, असे नवीन अधिसूचनेत म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in