शाश्वत विकास आवश्यक: जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांचे डब्ल्यूईएफमध्ये संबोधन

विकासाशिवाय नोकऱ्या नाहीत, समृद्धी नाही आणि अनेकदा असे घडते की, विकासाशिवाय शांतता मिळणार नाही.
शाश्वत विकास आवश्यक: जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांचे डब्ल्यूईएफमध्ये संबोधन
Published on

नवी दिल्ली : जागतिक परिस्थितीला आकार देण्यासाठी आर्थिक विकासाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देत रोजगार निर्मिती, समृद्धी आणि शांतता राखण्यासाठी शाश्वत विकास आवश्यक आहे यावर जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी भर दिला. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना बंगा यांनी वरील भूमिका मांडली.

आपल्या मुख्य भाषणादरम्यान बंगा म्हणाले, वास्तविकता ही आहे की, आम्ही दशकाच्या पहिल्या सहामाहीत ३० वर्षांतील सर्वात कमी विकास दराकडे वाटचाल करत आहोत.

विकासाशिवाय नोकऱ्या नाहीत, समृद्धी नाही आणि अनेकदा असे घडते की, विकासाशिवाय शांतता मिळणार नाही. त्यामुळे मला वाटते की नजीकच्या आणि मध्यम कालावधीत विकास हा आपल्या आव्हानांचा केंद्रबिंदू आहे. आपल्या भाषणादरम्यान, बंगा यांनी नजीकच्या आणि मध्यम कालावधीत जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील बहुआयामी आव्हानांवर प्रकाश टाकला. त्यांनी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील वाढती कर्जे ही एक प्रमुख चिंता असल्याचे वर्णन करून सांगितले की, त्यात परदेशी आणि देशांतर्गत कर्जाचा समावेश आहे.

उभरत्या अर्थव्यवस्थेत कर्ज हे चिंतेचे मोठे कारण

बंगा म्हणाले, उभरत्या अर्थव्यवस्थेत कर्ज हे चिंतेचे एक मोठे कारण आहे. चिंतेचे कारण म्हणजे केवळ विदेशी कर्ज नाही; तर कमी व्याजदराने घेतले जाणारे देशांतर्गत कर्ज देखील आहे. परिस्थितीजन्य भू-राजकीय आव्हाने आहेत, व्यापार तणाव आहेत आणि मला वाटते की कोणतीही सवलत देऊ नये. जर चीनची अर्थव्यवस्था आणखी कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या जागतिक आर्थिक परिस्थितीवर होईल, असे ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेने गेल्या वर्षभरात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली असली तरी सकारात्मक घडामोडी असूनही या चिंता कायम असल्याचे त्यांनी मान्य केले.

logo
marathi.freepressjournal.in