Pahalgam terror attack : आदिलच्या कुटुंबीयांना ५ लाख; उपमुख्यमंत्री शिंदे सय्यदच्या कुटुंबीयांना घर बांधून देणार

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांच्या मदतीसाठी धाव घेणारा जम्मू- काश्मीरमधील २० वर्षीय सय्यद आदिल हुसैन शाह याचा मृत्यू झाला.
Pahalgam terror attack : आदिलच्या कुटुंबीयांना ५ लाख; उपमुख्यमंत्री शिंदे  सय्यदच्या कुटुंबीयांना घर बांधून देणार
Published on

मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांच्या मदतीसाठी धाव घेणारा जम्मू- काश्मीरमधील २० वर्षीय सय्यद आदिल हुसैन शाह याचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरीत्या सय्यदच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत करत मोडकळीस आलेले घर बांधून दिले जाणार आहे. पहलगाम येथे मदतीसाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून शुक्रवारी सय्यदच्या कुटुंबीयांना धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

सय्यद आदिलच्या कुटुंबीयांची शिवसेना कार्यकर्ते आणि सरहदचे पदाधिकारी यांनी भेट घेत मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी स्थानिक आमदार सईद रफीक शाह उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सय्यदच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सय्यद आदिलच्या भावाने हल्ल्याच्या दिवशी झालेला घटनाक्रम सांगितला. त्याने पर्यटकांच्या बचावासाठी कशा प्रकारे दहशतवाद्यांशी मुकाबला केला. रायफल खेचली आणि दहशतवाद्यांनी त्याला कशा गोळ्या घातल्या हा अनुभव त्याने सांगितला.

logo
marathi.freepressjournal.in