टी. एन. शेषन यांचे आत्मचरित्र प्रकाशित

प्रामाणिक काम करून त्यांनी हे मोठे बदल घडवले
टी. एन. शेषन यांचे आत्मचरित्र प्रकाशित

चेन्नई : भारतीय निवडणूक क्षेत्रात व्यापक बदल करणारे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त कै. टी. एन. शेषन यांचे आत्मचरित्र शनिवारी अधिकृतरित्या प्रकाशित झाले. संकल्प ब्युटीफूल वल्डचे अध्यक्ष लक्ष्मुणदास कालीदोस यांच्या हस्ते या ‘थ्रु द ब्रोकन ग्लास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले.

यावेळी माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती म्हणाले की, जेव्हा निवडणूक आयोगाचा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा शेषन पूर्व काळ व शेषन यांच्या नंतरचा काळ अशी त्यात नोंद होईल. केवळ प्रामाणिक काम करून त्यांनी हे मोठे बदल घडवले.

या आत्मचरित्राची पहिली प्रत कृष्णमूर्ती यांनी पोलीस महासंचालक (तुरुंग) अमरेश पुजारी यांना दिली. यावेळी चेन्नईचे आयुक्त जे. राधाकृष्णन, नौदलाचे ध्वजाधिकारी रिअर ॲॅडमिरल रवी कुमार धिंग्रा, अरकॉट फाऊंडेशनचे विश्वस्त नवाबझादा मोहम्मद असीफ अली हे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in