भारत-चीनमध्ये आज चर्चा

लडाख घुसखोरीसंदर्भात कोअर कमांडर पातळीवरील १९वी बैठक
भारत-चीनमध्ये आज चर्चा

लेह : चीनने लडाख प्रांतात केलेल्या घुसखोरीसंदर्भात भारत आणि चीन यांच्या लष्कराच्या कोअर कमांडर पातळीवरील १९वी बैठक सोमवारी, १४ ऑगस्ट रोजी पार पडत आहे.

चीनने २०२० साली लडाखमध्ये घुसखोरी केल्यापासून दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चेच्या १८ फेऱ्या झाल्या आहेत. चर्चेची यापूर्वीची फेरी २३ एप्रिल रोजी मोल्डो येथे पार पडली होती. त्याद्वारे काही ठिकाणांवरून चीनने सैन्यमाघारी घेण्यास मान्यता दिली. मात्र, देप्सांग आणि डेमचोक भागातून चीनने अद्याप सैन्य मागे घेतलेले नाही. तेथूनही चीनने पूर्णपणे सैन्यमाघार घ्यावी, अशीच भारताची चुशुल येथे होणाऱ्या या बैठकीतही मागणी आहे. भारतीय लष्कराच्या लेहस्थित १४व्या कोअरचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बली भारताच्या वतीने चर्चेचे नेतृत्व करतील. जी-२० संघटनेची शिखर परिषद यंदा भारतात भरत आहे. त्याला चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने चुशुलमधील या बैठकीतील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in