

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी त्यांचे पूर्वसुरी आणि द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टालिन यांची त्यांच्या अल्वॉरपेट येथील निवासस्थानी भेट घेतली.
मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विजय यांची स्टालिन यांच्यासोबतची ही पहिलीच भेट असून, या भेटीचे वर्णन 'सदिच्छा भेट' असे करण्यात आले आहे. यावेळी एम.के. स्टालिन आणि उदयनिधी स्टालिन यांनी मुख्यमंत्री विजय यांचे स्वागत केले.
विजय यांचे आगमन होताच उदयनिधी स्टालिन यांनी हस्तांदोलन करत त्यांना आलिंगन दिले. त्यानंतर एम.के. स्टालिन यांनीही मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. उभय नेत्यांनी एकमेकांना रेशमी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.