वडील मुख्यमंत्री, मुलगा उपमुख्यमंत्री! उदयनिधी स्टॅलिन बनले तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे रविवारी उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
उदयनिधी स्टॅलिन
उदयनिधी स्टॅलिनफेसबुक
Published on

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन हे रविवारी उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. तसेच स्टॅलिन मंत्रिमंडळात काही फेरबदल करण्यात आले असून, वी. सेंथिल बालाजी, आर. राजेंद्रन, डॉ. गोवी चेझियान आणि एस. एम. नासर यांना स्टॅलिन सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आले आहे.

रविवारी राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल आर. एन. रवी यांनी सेंथिल बालाजी यांच्यासोबत चार द्रमुक नेत्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. उदयनिधी हे पूर्वीच मंत्री असल्याने त्यांनी शपथ घेतली नाही.

तामिळनाडूत हे दुसऱ्यांदा घडले आहे, जेव्हा वडील मुख्यमंत्री व मुलगा उपमुख्यमंत्री आहे. २००९ ते २०११ या काळात एम. के. स्टॅलिन उपमुख्यमंत्री होते आणि त्यांचे वडील एम. करुणानिधी हे मुख्यमंत्री होते.

उदयनिधी यांना युवा कल्याण, क्रीडा विकासासोबतच योजना व विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष व सरकारचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या वडिलांचे उत्तराधिकारी म्हणून उदयनिधी यांना पुढे आणले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in