तामिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह हटवले; तामिळ भाषेत केले

राष्ट्रीय शिक्षण धोरण व भाषिक धोरणान्वये तामिळनाडू सरकार व केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. आता तामिळनाडूतील स्टालिन सरकारने राज्यातील अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह ‘₹’ बदलून तमिळमध्ये केले आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन(संग्रहित छायाचित्र, PTI)
Published on

चेन्नई : राष्ट्रीय शिक्षण धोरण व भाषिक धोरणान्वये तामिळनाडू सरकार व केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. आता तामिळनाडूतील स्टालिन सरकारने राज्यातील अर्थसंकल्पातून रुपयाचे चिन्ह ‘₹’ बदलून तमिळमध्ये केले आहे.

तमिळनाडूत द्रमुक सरकार असून त्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन आहेत. सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात ‘₹’ बोधचिन्ह बदलले आहे. हे तमिळ लिपीतील अक्षर रू आहे.

केंद्र सरकार आणि तमिळनाडु सरकारमध्ये हिंदीवरून काही महिन्यांपासून वाद सुरू आहे. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणातनुसार तीन भाषा धोरण लागू करण्यास सांगितले आहे. त्यात हिंदी, इंग्रजी व स्थानिक भाषेचा समावेश आहे. तामिळनाडू सरकार हिंदीच्याविरोधात आहे.

भाजपाचे तमिळनाडु अध्यक्ष के. अन्नामलाई ने ‘एक्स’वरून मुख्यमंत्री स्टालिन यांना ‘स्टुपिड’ म्हटले आहे. त्यांनी लिहिले की, ‘₹’ हे बोधचिन्ह तमिळनाडूच्या थिरू उदयकुमार यांनी डिझाईन केले होते. ते द्रमुकच्या माजी आमदाराचे पूत्र आहेत. या बोधचिन्हाला संपूर्ण भारताने स्वीकारले. पण, द्रमुक सरकारने त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पातून हटवून मुर्खपणाचा परिचय दिला.

तमिळनाडूत सध्या तीन भाषेवरून मोठा वाद सुरू आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन व केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण धोरणावरून वाद सुरू आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार वादही झाले.

logo
marathi.freepressjournal.in