टाटा मोटर्सची प्रवासी वाहने १ फेब्रुवारीपासून महागणार

अनेक प्रवासी वाहनांची विक्री करते. दरम्यान, टाटा मोटर्सपाठोपाठ अन्य वाहन कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता आहे
टाटा मोटर्सची प्रवासी वाहने १ फेब्रुवारीपासून महागणार

नवी दिल्ली : देशांतील आघाडीची वाहन कंपनी टाटा मोटर्सने रविवारी सांगितले की, ते पुढील महिन्यापासून लागू होणाऱ्या ईव्हीसह संपूर्ण प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी ०.७ टक्क्यानी वाढवतील. ही वाढ १ फेब्रुवारी २०२४ पासून लागू होईल आणि उत्पादन खर्चातील वाढ अंशतः भरून काढली जात आहे, असे टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनी पंच, नेक्सॉन आणि हॅरियरसह अनेक प्रवासी वाहनांची विक्री करते. दरम्यान, टाटा मोटर्सपाठोपाठ अन्य वाहन कंपन्याही दरवाढ करण्याची शक्यता आहे

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in