१०० मेगावॉट AI ची पायाभूत सुविधा उभारणार; टाटा समूह व ओपन एआयमध्ये करार

देशातील मोठा उद्योग समूह टाटा आणि ‘ओपन एआय’ यांनी गुरुवारी भारतात १०० मेगावॉट क्षमतेची, पुढे १ गिगावॉटपर्यंत वाढवता येणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पायाभूत सुविधा उभारण्याच्या योजनेवर आधारित धोरणात्मक भागीदारी जाहीर केली.
१०० मेगावॉट AI ची पायाभूत सुविधा उभारणार; टाटा समूह व ओपन एआयमध्ये करार
Published on

नवी दिल्ली : देशातील मोठा उद्योग समूह टाटा आणि ‘ओपन एआय’ यांनी गुरुवारी भारतात १०० मेगावॉट क्षमतेची, पुढे १ गिगावॉटपर्यंत वाढवता येणारी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) पायाभूत सुविधा उभारण्याच्या योजनेवर आधारित धोरणात्मक भागीदारी जाहीर केली. या सहकार्याअंतर्गत उद्योगांमध्ये ‘एआय’ स्वीकाराला गती देणे, उद्योगनिहाय उपाय विकसित करणे आणि तरुणांसाठी ‘एआय’ कौशल्यविकास विस्तारण्याचे संयुक्त उपक्रम राबवले जातील.

या करारांतर्गत टीसीएसचे ‘हायपरव्हॉल्ट’ युनिट पुढील पिढीच्या ‘एआय’ वर्कलोड्सना समर्थ अशा, हरित ऊर्जेवर चालणाऱ्या ‘एआय’तयार पायाभूत सुविधा विकसित करणार आहे.

या सुविधेमध्ये उद्देशानुरूप तयार केलेली, द्रव-शीतकरण असलेली डेटा सेंटर्स, उच्च रॅक घनता आणि प्रमुख क्लाऊड प्रदेशांतील कनेक्टिव्हिटी असेल. त्यामुळे भारताला जागतिक ‘एआय’ हब म्हणून स्थान मिळण्यास मदत होईल.

टीसीएस प्रारंभिक टप्प्यात १०० मेगावॉट क्षमतेची ‘एआय’ पायाभूत सुविधा उभारेल, जी एक गिगावॉटपर्यंत वाढवण्याचा पर्याय असेल. ही सुविधा पुढील पिढीच्या ‘एआय’ वर्कलोड्सना शक्ती देईल आणि भारताला जागतिक ‘एआय’ हब म्हणून उभे करेल,” असे कंपनीने सांगितले.

भारतीय तसेच जागतिक उद्योगांसाठी ‘ओपन एआय’चे ‘एआय’ तैनात करणे, एकत्रीकरण करणे आणि त्यांचा विस्तार करणे टीसीएस करेल, ज्यामुळे संस्थात्मक पातळीवर ‘एआय’च्या परिवर्तनाला पाठबळ मिळेल.‘ओपन एआय फॉर इंडिया’ आणि टाटा समूहासोबतच्या भागीदारीतून, भारतामध्ये- ‘एआय’ उभारण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कौशल्ये आणि स्थानिक भागीदारी विकसित करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in