कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब

टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या 'टाटा सन्स'ची वार्षिक सार्वसाधारण सभा आवश्यक कोरमअभावी (गणपूर्ती न झाल्याने) मंगळवारी तहकूब करावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब
कोरमअभावी टाटा सन्सची AGM अखेर तहकूब
Published on

मुंबई : टाटा समूहाची होल्डिंग कंपनी असलेल्या 'टाटा सन्स'ची वार्षिक सार्वसाधारण सभा आवश्यक कोरमअभावी (गणपूर्ती न झाल्याने) मंगळवारी तहकूब करावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

संयुक्तपणे प्रतिनिधी नामनिर्देशित करणारे 'सर दोराबजी टाटा ट्रस्ट' आणि 'सर रतन टाटा ट्रस्ट' उपस्थित राहू न शकल्यामुळे ही सभा तहकूब करावी लागली, असे सूत्रांनी सांगितले. टाटा सन्समध्ये 'टाटा ट्रस्ट्स'ची दोन-तृतीयांश मालकी आहे. संपूर्ण टाटा ट्रस्ट्सअंतर्गत येणाऱ्या विविध सेवाभावी संस्थांमध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट या दोन संस्था आहेत.

महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशांमुळे सर रतन टाटा ट्रस्टवर निर्बंध लादण्यात आले असून, त्यांना कोणतेही मोठे निर्णय न घेण्याचे अथवा बैठका आयोजित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नियुक्ती स्वीकारण्यास नकार दिल्याच्या वृत्ताला एक आठवडाही उलटला नसताना ही एजीएम पार पडत असल्याने तिला अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in