'हे' आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार; तब्बल ५,८८५ कोटी रुपयांची संपत्ती

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात त्यांनी फिजिशियन टीचर म्हणून काम केले. विजयवाडा येथील विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले, तर पेनसिल्वेनिया येथून त्यांनी एमडी केले.
 पी. चंद्रशेखर
पी. चंद्रशेखरफोटो सौजन्य - X/@PemmasaniOnX

अमरावती : तेलगू देसम पार्टीचे गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पी. चंद्रशेखर हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी आपल्या कुटुंबाची ५,८८५ कोटी रुपयांची चल-अचल मालमत्ता जाहीर केली आहे.

पी. चंद्रशेखर यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची वैयक्तिक मालमत्ता २,४४८.७२ कोटी, पत्नी श्रीरत्न कोनेरू २,३४३.७८ कोटी, मुलांच्या नावावर हजार कोटींची मालमत्ता आहे, तर चंद्रशेखर यांच्या कुटुंबीयांवर अमेरिकेतील जे. पी. मॉर्गन चेस बँकेचे अमेरिकेत ११३८ कोटी रुपयांचे कर्ज आहे.

एडीआर संस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील नकुल नाथ यांनी आपली मालमत्ता ७१७ कोटी रुपये जाहीर केली होती. आंध्र प्रदेशातील बुरीपालेम गावातून चंद्रशेखर यांचा प्रवास सुरू झाला. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात त्यांनी फिजिशियन टीचर म्हणून काम केले. विजयवाडा येथील विद्यापीठातून त्यांनी एमबीबीएस केले, तर पेनसिल्वेनिया येथून त्यांनी एमडी केले. चंद्रशेखर यांना सामाजिक सेवेत रस होता. २०१० पासून ते तेलगू देसमच्या अनिवासी विभागाचे काम करत होते. त्यांनी अनेक सामाजिक कल्याण उपक्रम राबवले.

बहुतांशी गुंतवणूक व मालमत्ता अमेरिकेत

चंद्रशेखर यांची बहुतांशी गुंतवणूक व समभाग हे अमेरिकेतील कंपनीत आहेत. तसेच त्यांच्याकडे अमेरिकेत रोल्स रॉइल्स घोस्ट, मर्सिडीज बेंझ व टेस्ला या लक्झरी कार आहेत. चंद्रशेखर यांच्याविरोधात वायएसआर काँग्रेसचे के. वेंकट रोसय्या हे निवडणूक लढवत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in