प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड

प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड
Published on

प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाकडे मंगळवारी अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यात वेबसाईटचा सर्च फिचर काम करत नसल्याचे सांगितले.

प्राप्तिकर विभागाने सांगितले की, बेवसाईटमध्ये निर्माण झालेली तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आयटी कंपनी इन्फोसिसला आदेश देण्यात आले आहेत. कंपनीनेही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

गेल्यावर्षी ७ जून २०२१ मध्ये प्राप्तिकर पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. २०२२-२३ च्या प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ निश्चीत केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in