तंत्रज्ञान उद्योगाचा महसूल २५४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल; नासकॉमचा अंदाज

मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीच्या निर्णयानंतरही तंत्रज्ञान उद्योगाने निव्वळ ६० हजार नोकऱ्यांची नव्याने भरती केली
तंत्रज्ञान उद्योगाचा महसूल २५४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल; नासकॉमचा अंदाज

मुंबई : देशांतर्गत तंत्रज्ञान उद्योगाचा महसूल चालू आर्थिक वर्षात ३.८ टक्क्यांनी वाढून २५४ अब्ज अमेरिकन डॉलर्स होईल, असा अंदाज नासकॉमने शुक्रवारी व्यक्त केला. हार्डवेअर वगळून महसूल १९९ अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल आणि आर्थिक वर्ष २३ च्या तुलनेत त्यात ३.३ टक्क्यांनी वाढ होईल.

आर्थिक वर्ष २४ मध्ये एकूण निर्यात महसुलात एकट्या अभियांत्रिकी संशोधन आणि विकास (ER&D) क्षेत्राचे योगदान ४८ टक्के आहे, असे नासकॉमने आपल्या वार्षिक आढाव्यात म्हटले आहे. जागतिक स्तरावर २०२३ मध्ये तंत्रज्ञान खर्चात ५० टक्क्यांची घसरण आणि तंत्रज्ञान कॉन्ट्रॅक्टमध्ये ६ टक्क्यांनी घट होऊनही अंदाजित ३.८ टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा अर्थ उद्योगाने आर्थिक वर्षात ९.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी महसुलात भर घातली आहे, असे नासकॉमने म्हटले आहे.

मोठ्या प्रमाणावर नोकरकपातीच्या निर्णयानंतरही तंत्रज्ञान उद्योगाने निव्वळ ६० हजार नोकऱ्यांची नव्याने भरती केली असून वर्षभरात एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ५.४३ दशलक्ष झाली, असेही या अहवालाात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in