"तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार", आगामी लोकसभेसाठी भाजपची घोषणा ठरली

भाजपकडून राम मंदिराबाबत 25 जानेवारी पासून 25 मार्चपर्यंत मेगा अभियान राबवण्यात येणार असल्याचे देखील या बैठकीत निश्चित झाले.
"तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार", आगामी लोकसभेसाठी भाजपची घोषणा ठरली

भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून यंदाच्या निवडणुकीसाठी घोषणा ठरवली आहे. 2024च्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजपकडून "तीसरी बार मोदी सरकार, अब की बार 400 पार", ही घोषणा ठरवण्यात आली आहे. गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही घोषणा ठरवण्यात आली. या बैठकीला भाजपचे अनेक बडे नेते उपस्थित होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 जागांचा टप्पा ओलांडण्याचे ध्येय ठेवले आहे. तसेच, प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली जाणार आहे. याच बरोबर भाजपने राज्यात, लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजक निश्चित केले आहेत. लवकरच पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि जेपी नड्डा यांचे लोकसभा क्लस्टर्समध्ये दौरे सुरू होणार आहेत.

राम मंदिराबाबत अभियान राबवणार

भाजपकडून राम मंदिराबाबत 25 जानेवारी पासून 25 मार्चपर्यंत मेगा अभियान राबवण्यात येणार असल्याचे देखील या बैठकीत निश्चित झाले. यात रामलल्लाच्या दर्शनाला जाणाऱ्या लोकांची भाजपकडून मदत केली जाणार आहे. बुथ कार्यकर्त्यांना रामलल्लाच्या दर्शानासाठी इच्छूक असणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहून त्यांची मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in