
नवी दिल्ली: मिग-२१ निवृत्त झाल्यानंतर भारतीय वायुदलाला लढाऊ विमानांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला सरकारने ८५ हजार कोटी रुपयांच्या खचनि ९७ तेजस विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. आता संरक्षण मंत्रालयाचे सचिव ए. के. सिंह म्हणाले की, या वर्षांखेरपर्यंत दोन स्वदेशी लढाऊ विमान तेजस मार्क-१ ए मिळण्याची शक्यता आहे. जे मिग-२१ ची जागा घेतील.
शनिवारी संरक्षण सचिव आ. के. सिंह म्हणाले, भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वेगाने आगेकूच करत आहे. त्यांनी अशी शक्यता व्यक्त केली की सप्टेंबर अखेरपर्यंत भारतीय वायुदलाला दोन स्वदेशी लढाऊ विमान मार्क-१ ए मिळू शकतील. जे भारतीय वायुदलासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
संरक्षण सचिवांनी सांगितले की, आम्ही हिंदुस्थान एअरोनॉटिकल लिमिटेडला 'तेजस' विमान अधिक सक्षम बनवण्यासाठी पुरेशी संधी द्यायची आहे. सध्या सुमारे ३८ तेजस विमाने सेवेत आहेत, आणखी ८० तयार केली जात आहेत. त्यापैकी १० तयार आहेत आणि दोन इंजिने मिळाली आहेत. शस्त्रास्त्रांसह पहिले दोन विमाने सप्टेंबरपर्यंत मिळतील अशी अपेक्षा आहे.
सिंह यांनी सांगितले की, एचएएलकडे पुढील चार-पाच वर्षांसाठी पुरेसे ऑर्डर आहेत. त्यांनी म्हटले की, मला अपेक्षा आहे की तेजस लढाऊ विमान आणखी सक्षम होईल. यात रडार आणि भारतीय शस्त्रे जोडली जातील, ज्यामुळे ते सुखोईसोबत एकत्रितरीत्या काम करू शकेल.