हैदराबाद/पुद्दुचेरी : तेलंगणाच्या राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सोमवारी राजभवनातून जाहीर करण्यात आले. सुंदरराजन या तामिळनाडूतून लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.
तामिळीसाई या पुद्दुचेरीच्याही नायब राज्यपाल होत्या. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा सादर केला आहे. सुंदरराजन यांनी २०१९ मध्ये भाजपच्या तिकिटावर थुतूकुडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, मात्र द्रमुकच्या कनिमोळी यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळीही त्या भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.