तेलंगणात ओबीसी आरक्षण ४२ टक्क्यांवर; मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची मोठी घोषणा

तेलंगणातील आरक्षणाची मर्यादा ६२ टक्के होणार आहे. सुप्रीम कोर्टाने निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाचे यामुळे उल्लंघन होणार आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी संग्रहित छायाचित्र
Published on

हैदराबाद : तेलंगणात ओबीसी आरक्षणाची मर्यादा २३ वरून ४२ टक्क्यांवर नेली आहे. याबाबतची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. या निर्णयामुळे तेलंगणातील आरक्षणाची मर्यादा ६२ टक्के होणार आहे. सुप्रीम कोर्टाने निर्धारित केलेल्या ५० टक्के आरक्षणाचे यामुळे उल्लंघन होणार आहे.

काँग्रेसने २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी आरक्षण २३ वरून ४२ टक्के करण्याचे आश्वासन दिले होते. तेलंगणात मागासवर्गीयांची लोकसंख्या ४६.२४ टक्के, अनुसूचित जाती १७.४३ टक्के, तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या १०.४५ टक्के आहे. मुख्यमंत्री रेड्डी म्हणाले की, तेलंगणात सत्ता मिळाल्यावर आम्ही जात जनगणना केली. आता आम्ही राज्यपालांना ओबीसी आरक्षण ४२ टक्के करत असल्याचा नवीन प्रस्ताव पाठवणार आहोत. त्यासाठी आम्ही आवश्यक कायदेशीर मदतही घेणार आहोत. ओबीसींना ४२ टक्के आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in