Telangana Plane Crash Video: तेलंगणात ट्रेनर विमान कोसळलं; दोन वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ही दुर्घटना घडली.
Telangana Plane Crash Video: तेलंगणात ट्रेनर विमान कोसळलं; दोन वैमानिकांचा मृत्यू

तेलंगणात विमान अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळलं. यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी ८:५५ वाजता वायुदलाचे Pilatus ट्रेनर विमान क्रॅश झालं. यात दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. यात एक प्रशिक्षक तर एका प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in