दहा राज्यांकडून सीबीआयला तपासासाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे

तामिळनाडू आणि तेलंगणासह दहा राज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे
दहा राज्यांकडून सीबीआयला तपासासाठी दिलेली सर्वसाधारण संमती मागे
PM

नवी दिल्ली : तामिळनाडू आणि तेलंगणासह दहा राज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील प्रकरणांचा तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे, अशी माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली.  

दिल्ली स्पेशल पोलिस एस्टॅब्लिशमेंट (डीएसपीई) कायदा, १९४६ च्या कलम ६ नुसार, केंद्रीय अन्वेषण ब्यूरोला (सीबीआय) त्यांच्या अधिकारक्षेत्रात तपास करण्यासाठी संबंधित राज्य सरकारांची संमती आवश्यक आहे.

कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लेखी उत्तरात सांगितले की, पंजाब, झारखंड, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मिझोराम, तेलंगणा, मेघालय आणि तामिळनाडू या राज्यांनी सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे.

केंद्र सरकारने डीएसपीई कायद्याच्या कलम ६ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे का, या प्रश्नावर त्यांनी तसा प्रसाताव दिला नसल्याचे सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in