उत्तर प्रदेशात भीषण अपघात! ९ जणांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशात भीषण अपघात! ९ जणांचा मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी

टँकर टेम्पोवर पटली झाल्याने हा भीषण अपघात घडल्याचं प्रथमदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे

उत्तर प्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यात सोमवारी एक भीषण अपघात घडला आहे. प्रवाशाांनी भरलेलया टेम्पोवर टँकर उलटल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिका नागरिकांनी तसंच पोलिसांनी घटनास्थखील धाव घेत बचाव कार्य सुरु केलं.

टँकर टेम्पोवर पटली झाल्याने हा भीषण अपघात घडल्याचं प्रथमदर्शी नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीत मृत्यू झाला आहे. तर ५ जणांचा मृत्यू हा उपचारादरम्यान झाला आहे. तसंच अन्य चार जण देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. अपघातग्रस्त ट्रकमध्ये गॅस भरला होता. अपघातानंतर हा गॅस लिक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in