तामिळनाडूच्या कृष्णगिरीत सिलेंडरचा भीषण स्फोट ; 6 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

अग्निशनम दलाच्या जवांनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्फोट झाल्याने इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे
तामिळनाडूच्या कृष्णगिरीत सिलेंडरचा भीषण स्फोट ; 6 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
Published on

तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील पासियापेट्टा भागातील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे रेस्टॉरंटजवळील फटाक्याच्या गोदामातही ही आग परसरली. यामुळे या परिसरात मोठा स्फोट झाला. मिळालेल्या माहिती नुसार, रेस्टॉरंटमध्ये जेवणारे लोक या आगीत अडकले. ज्यात ६ लोकांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फटाक्याच्या गोदामालाही आग लागल्याने अनेक स्फोट झाले, त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान बोलावण्यात आले. अग्निशनम दलाच्या जवांनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. स्फोट झाल्याने इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत बाहेर काढण्यात आलेल्या जखमींवर उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मृतांची ओळख पटली

या दुर्घटनेत फटाक्यांच्या गोदामाचा मालक रवी, त्याची पत्नी, जयश्री, मुलगी रुकिता, मुलगा रुद्दीश, रेस्टॉरंट मालक राजेश्वरी, इम्रान आणि इब्राहिम यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तक या वर्दळीच्या परिसरात फटाके फटाक्यांच्या गोदामाला परवानगी कशी देण्यात आली. याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाकडून ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम कुरु आहे. जिल्हाधिकारी सरयू आणि पोलीस अधिक्षक सरोज कुमार यांनी घटनास्थळी दाखल होतं परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in