दहशतवाद्यांनी सीमेजवळ उभारले लाँच पॅड्स; BSF ची माहिती

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष सीमारेषेजवळ ७२ लाँच पॅड्स उभारले आहेत. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने याबाबतची माहिती दिली आहे.
दहशतवाद्यांनी सीमेजवळ उभारले लाँच पॅड्स; BSF ची माहिती
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. पाकिस्तानी लष्कर व आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांनी आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष सीमारेषेजवळ ७२ लाँच पॅड्स उभारले आहेत. भारताच्या सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) याबाबतची माहिती दिली आहे.

पाकिस्तानच्या सियालकोट व जफरवाल भागातील खोल दऱ्यांमध्ये १२ लाँच पॅड्स सुरू आहेत. इतर वेगवेगळ्या ठिकाणी मिळून ६० लाँच पॅड्स सक्रिय आहेत. हे लाँच पॅड्स स्थायी नसतात. भारतात घुसखोरी करण्यापूर्वी, दहशतवाद्यांची एखादी मोठी तुकडी भारतात घुसखोरी करणार असेल तर त्याच्या काही दिवस आधी सीमेलगत असे लाँच पॅड्स सक्रिय केले जातात.

सध्या आंतरराष्ट्रीय सीमेनजीक दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र किंवा कुठलाही तळ नाही. मात्र, त्यांच्या हालचाली वाढल्या आहेत, असे बीएसएफचे म्हणणे आहे.

बांगलादेशात तळ

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने भारतावर हल्ला करण्याची तयारी केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यासाठी त्याने बांगलादेश येथे दहशतवादी तळ उभारल्याचे सांगितले गेले. या घडामोडींमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, सीमेपलीकडून होणाऱ्या संभाव्य घुसखोरीवर करडी नजर ठेवली जात आहे.

पाकिस्तानने पुन्हा उभारले लाँच पॅड

भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या आणि दहशतवादी तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर पाकिस्ताने गुप्त पद्धतीने ७२ दहशवादी लाँच पॅडची उभारणी केली आहे. त्यापैकी बरेसचे पॅड जम्मू आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रणरेषेजवळ असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

एकत्र प्रशिक्षण

बीएसएफचे उपमहानिरीक्षक म्हणाले, पूर्वी जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी वेगवेगळ्या ठिकाणी राहायचे. ते पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात सक्रिय असतात. मात्र, ऑपरेशन सिंदूरनंतर जैश व लष्करच्या दहशतवाद्यांना एकत्र ठेवले जात असून त्यांना एकत्र प्रशिक्षण दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in