दहशतवादी बिलाल अहमद भट ठार

दहशतवादी बिलाल अहमद भट ठार

बिलाल अहमद भट, चेक चोलन येथील रहिवासी होता. दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित आहे.

श्रीनगर : लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फयाज यांचे अपहरण आणि हत्येमध्ये सामील असलेला लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) दहशतवादी बिलाल अहमद भट शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील छोटीगाम गावात दहशतवादी असल्याच्या विशिष्ट माहितीवर कारवाई करत, सुरक्षा दलांनी पहाटे एक घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली. सुरक्षा दल संशयित जागेजवळ पोहोचताच, लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर देण्यात आले. त्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला आणि चकमकीच्या ठिकाणाहून त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

बिलाल अहमद भट, चेक चोलन येथील रहिवासी होता. दहशतवादी संघटना एलईटीशी संबंधित आहे. भट अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील होता, ज्यात सुडसान कुलगाम येथील स्थानिक लष्करातील कर्मचारी उमर फयाज यांच्या हत्येचा समावेश आहे. २२ वर्षीय लष्करी अधिकारी लेफ्टनंट फयाज हे २ राजपुताना रायफल्सचे होते. ते रजेवर होते आणि चुलत भावाच्या लग्नसमारंभाला उपस्थित होते, तेव्हा मे २०१७ मध्ये शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले आणि नंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, अशी माहिती शोपियांचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) तनुश्री यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in