दहशतवादी 'हाफीझ सईद'चा पक्ष पाकिस्तानी निवडणुकीत

पाकिस्तानमध्ये गुरुवारी (८ फेब्रुवारी) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून त्यात मुंबईतील २००८ सालच्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफीझ सईद याचा नवा राजकीय पक्षही सहभागी होणार आहे.
दहशतवादी 'हाफीझ सईद'चा पक्ष पाकिस्तानी निवडणुकीत

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गुरुवारी (८ फेब्रुवारी) होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून त्यात मुंबईतील २००८ सालच्या हल्ल्यांचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफीझ सईद याचा नवा राजकीय पक्षही सहभागी होणार आहे. सईदने पाकिस्तान मरकझी मुस्लीम लीगची स्थापना केली असून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. हाफीझ सईद सध्या लाहोर येथील तुरुंगात कैद आहे. भारतासाठी तो मोस्ट वाँटेड दहशतवादी आहे. पण त्याच्याशी संबंधित पक्ष पाकिस्तानी निवडणुकीत उतरला आहे. त्यात लष्कर-ए- तोयबा, जमात-उद-दावा अशा बंदी असलेल्या अनेक संघटनांचे उमेदवार असून ते निवडणूक लढवणार आहेत. पाकिस्तान मरकझी मुस्लीम लीग पक्षाच्या प्रवक्त्यांनी मात्र त्यांचा हाफीझ सईदशी काही संबंध नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या संघर्षग्रस्त बलुचिस्तान प्रांतातील ८० टक्क्यांहून अधिक मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in