जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवादी ठार

श्रीनगरच्या दाचिंगाम जंगलात मंगळवारी सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता, ऑक्टोबर महिन्यात गगनगीरमध्ये बोगद्याचे काम सुरू असताना दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्यामध्ये त्याचा हात होता, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील चकमकीत दहशतवादी ठार
Published on

श्रीनगर/जम्मू : श्रीनगरच्या दाचिंगाम जंगलात मंगळवारी सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता, ऑक्टोबर महिन्यात गगनगीरमध्ये बोगद्याचे काम सुरू असताना दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्यामध्ये त्याचा हात होता, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी माहिती दिल्यावरून सुरक्षा दलांनी दाचिंगाम जंगलात वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होताच सुरक्षा दलांनीही त्याला प्रत्युत्तर दिले त्यामध्ये एक दहशतवादी ठार झाला असून जुनैद अहमद भट असे त्याचे नाव आहे.

जुनैद भट हा लष्कर-ए-तोयबाच्या म्होरक्यांपैकी एक होता.गंडेरबल जिल्ह्यातील गगनगीर येथे बोगद्याचे काम सुरू असताना दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्यामध्ये भटचा हात होता. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा कामगार ठार झाले होते.

logo
marathi.freepressjournal.in